Wednesday, June 2, 2010

खूण

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जखम भरली तरी खूण तशीच रहाते..
वेदनेची आठवण मनाला करून देते..

वेळेचं औषध ही कामी येतं नाही..
उपाय करून ही खूण जात नाही..

जेव्हा जेव्हा खुणेकडे लक्ष जात..
विसरलेल दुःख पुन्हा आठवत..

भरलेली जखम परत चिघळते..
मागोमाग सारी कवाडं उघडते..

दरवाजातून आठवणीचा पूर येतो..
मनाला मग पुरताच वाहून नेतो..

खुणेची बोच जखमेपेक्षा थोडी जास्त..
म्हणून खूण मागे ना रहालेली रास्त..
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

श्रावणधारा

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नभ दाटले मेघ साठले सुसाट वाहे वारा..
मोतियाचा साज लेउनी बरसती श्रावणधारा..

चिब चिब धरती होते भिजते अंग अंग..
थेब थेंबातून वाजे सुरेल जल तरंग..

मिलनात हरखून जाई काळी माती बेधुंद..
रोम रोमातून दरवले ओलाशार सुगंध..

धुंद नाचे तालावर मयूर फूलवून पिसारा..
आनंदाच्या डोही नाहतो आसमन्त सारा..

कुंचल्यात भरुनी रंग फड़फड़ करिती तनू..
आभाळात रेखाटले विहँगानी सुरेख इंद्रधनु..

गर्द हिरवा शालू लेउन सजली वनराई..
डोईवर पांघरुन आभाळाची निळाई..

तन ओले मन ही ओले सारा निसर्ग ओला..
शब्दावाचून उमजे सारे अर्थ थेंबाला आला..
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Tuesday, June 1, 2010

भग्न ते स्वप्न

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जीर्ण जीर्ण विदीर्ण..
विखुरले अवशेष भग्न..
ओसाड मनाच्या तुकड्यावर..
राख झाले ते स्वप्न..

घोंघावला सुसाट वारा...
पोचला मनाचीया द्वारा..
उडल्या स्वप्नाच्या अस्थी..
भरला आसमंत सारा...

नाचती फेर धरुनी...
आठवण देती करुनी..
विसरू पाहणारे दुःख..
सर्वत्र दिसे क्षणोक्षणी...

आकांक्षाच्या कबरी झाल्या..
पापण्यांच्या कडा ओल्या..
अश्रूंच्या पुरामधे...
ओंजळी भरून गेल्या..
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

कविता

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
विचारांची जागा शब्दानी घेतली..
शब्दाची लेखणी कागदावर फिरली..

कागदाची ओंजळ शब्द फुलानी भरली..
शब्द मालेत गुंफून कविता जन्मली...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~